गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

मी चिखलीला पुरस्कार सोहळ्याला गेलो होतो तेव्हा आदल्या रात्री खूप छान चर्चा नंदूच्या घरात रंगली होती . त्या चर्चेचा सूर होता कि आपण करत असलेल्या समाजसेवेबद्दल खरं म्हणजे सरकारला काहीच देणे घेणे नाही . उलट सरकारचे काम आपण हलके करत आहोत . एकजण म्हणले कि ' जाऊ द्या भाऊ ; आपण फक्त सेवा करत रहायची ; सरकार लक्ष देवो अगर ना देवो ! ' यावर मी म्हटले कि , आपण करत असलेल्या समाजसेवेबद्दल सरकारनेसुद्धा काहीतरी भूमिका घ्यायला हवी . आपण यासाठी सरकारकडे पाठपुरावा करायला हवा . एकाच वेळी सरकारशी युक्तिवाद आणि पर्यायी सेवा ( शक्य असेल तर आपण द्यायला हवी ) . यावर हे शक्य नसल्याचा सूर काही क्षण आला . अमोल मानकर माझ्या बोलण्याशी काही अंशी सहमत झाला . पण मी मात्र यावर खप विचार करत राहिलो . माझ्या जगण्याची त-हा काहीशी अशीच आहे कि , मी एकाच वेळी शासकीय कर्मचारी आणि पर्याय या दोन्ही गोष्टींवर उर्जा देतो . 
मला एकदा शिरगुप्पे सर म्हणाले होते कि, ' समाजसेवा हि समाजसेवकांची खाज असते ' ( मी प्रतिकार केला होता सडेतोड म्हणा ! ) आपण आपली समाजसेवा हीच सबंधित प्रश्नावरचे अंतिम उत्तर आहे असे समजून चालणे चुकीचे आहे . सरकारने त्या दृष्टीने सक्षम व समक्ष लक्ष देऊन काहीतरी करावे यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे . नाहीतर सरकारने आपल्याला हि परवानगी द्यावी ; म्हणजे आपल्याला संबंधित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने उपाय योजना आणि त्याचा अहवाल आणि अंमलबजावणीसाठी लागणारी यंत्रणा यासंबंधीची आपण मागणी करायला हवी ! नाहीतर सरकार सगळ्या NGO वर बंदी आणणार आहे म्हणे . आता हे खरे आहे कि काम न करता पैसा हडप करणाऱ्या सामाजिक संस्था अस्तित्वात आहेत ; नाही असे नाही ! परंतु त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर बंदी आणावी ! नाहीतर आम्ही करत असलेल्या मुद्द्यावर लक्ष घालून प्रश्न सोडवावा ! कारण भारताची राज्यघटना प्रत्येक सजीवाच्या जगण्याच्या हक्कांचे संरक्षण करणारी आहे . काही सामाजिक संस्था अस्तित्वातच यासाठी आल्या आहेत कि देशी आणि विदेशी निधी बेईमानी करून हडप करता यावा यासाठीच ! याचा अर्थ ज्या संस्था प्रामाणिकपने संबंधित प्रश्न सोडण्यासाठी काम करत आहेत त्या संस्थांवर घाला का म्हणून ? 
मला खुपदा या प्रकारच्या प्रश्नाची विचारणा होते कि तुम्ही राजकारणावर कशाला बोलता किंवा लिहिता ? तेव्हा मी त्यांना सांगतो कि मला सामाजिक भूमिका आहे म्हणजेच राजकीय भूमिका आहे ! समाजकारण आणि राजकारण ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत ! ' राजकारण ' म्हणजे आपले हितसंबंध बरया वाईट हेतूने वापरणे होय ! त्याचबरोबर हे ' वापरणे ' म्हणजे त्या संबंधासाठी योगदान देणेसुद्धा आहे ! राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टींना भिन्न ठरवून कुठलीच भूमिका न घेणारे कित्येक समाजसेवक आहेत . त्यांना असे वाटत असावे कि आपण भले आणि आपले काम भले ! कित्ती दिव्य काम करत आहोत आपण वगैरे . परंतु सदासर्वकाळ आणि त्याच क्षमतेने फक्त आपणच ' हा ' प्रश्न सोडवू शकतो असे समजने चुकीचे आहे . समाजकार्य व्यापक प्रमाणात सफल व्हावे यासाठी सरकारकडेसुद्धा यासाठीच्या भूमिकेचा आग्रह आपण धरला पाहिजे . हे कार्य समांतर व्हायला हवे . सरकारने भूमिका घ्यावी यासाठी पाठपुरावा आणि त्याचवेळेला शक्य असल्यास पर्याय देणे . सरकारच्या हस्तक्षेपाने खुपश्या सेवा व्यापक होऊ शकतात . परंतु सरकारशिवाय काही अडते असे मुळीच नाही ; उलट हे काम सरकारशिवायही जोमाने आणि अधिक सर्जनशील होते ! परंतु नंतर आपल्याला कुनि असे म्हणायला नको कि , आपण हे कार्य व्यापक करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत वगैरे किंवा आपली खाज आहे किंवा हे काम चारीटेबल आहे वगैरे ! ' सरकार मदत कधीच करू शकणार नाही त्यामुळे आपण कशाला या फंदात पडूया ' असे म्हणणे योग्य होणार नाही . मी शासकीय कर्मचार्यांशी सेवेबद्दलचा आग्रह आणि त्याच वेळी पर्याय देण्याचा जास्तीच जास्त प्रयत्न करतो . 
हो ! मला राजकीय भूमिका आहे . या भूमिकेतूनच माझ्या जीवप्रेरणेचे समृद्धीकरण चालू असते ! मी चिखलीला पुरस्कार सोहळ्याला गेलो होतो तेव्हा आदल्या रात्री खूप छान चर्चा नंदूच्या घरात रंगली होती . त्या चर्चेचा सूर होता कि आपण करत असलेल्या समाजसेवेबद्दल खरं म्हणजे सरकारला काहीच देणे घेणे नाही . उलट सरकारचे काम आपण हलके करत आहोत . एकजण म्हणले कि ' जाऊ द्या भाऊ ; आपण फक्त सेवा करत रहायची ; सरकार लक्ष देवो अगर ना देवो ! ' यावर मी म्हटले कि , आपण करत असलेल्या समाजसेवेबद्दल सरकारनेसुद्धा काहीतरी भूमिका घ्यायला हवी . आपण यासाठी सरकारकडे पाठपुरावा करायला हवा . एकाच वेळी सरकारशी युक्तिवाद आणि पर्यायी सेवा ( शक्य असेल तर आपण द्यायला हवी ) . यावर हे शक्य नसल्याचा सूर काही क्षण आला . अमोल मानकर माझ्या बोलण्याशी काही अंशी सहमत झाला . पण मी मात्र यावर खप विचार करत राहिलो . माझ्या जगण्याची त-हा काहीशी अशीच आहे कि , मी एकाच वेळी शासकीय कर्मचारी आणि पर्याय या दोन्ही गोष्टींवर उर्जा देतो . 
मला एकदा शिरगुप्पे सर म्हणाले होते कि, ' समाजसेवा हि समाजसेवकांची खाज असते ' ( मी प्रतिकार केला होता सडेतोड म्हणा ! ) आपण आपली समाजसेवा हीच सबंधित प्रश्नावरचे अंतिम उत्तर आहे असे समजून चालणे चुकीचे आहे . सरकारने त्या दृष्टीने सक्षम व समक्ष लक्ष देऊन काहीतरी करावे यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे . नाहीतर सरकारने आपल्याला हि परवानगी द्यावी ; म्हणजे आपल्याला संबंधित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने उपाय योजना आणि त्याचा अहवाल आणि अंमलबजावणीसाठी लागणारी यंत्रणा यासंबंधीची आपण मागणी करायला हवी ! नाहीतर सरकार सगळ्या NGO वर बंदी आणणार आहे म्हणे . आता हे खरे आहे कि काम न करता पैसा हडप करणाऱ्या सामाजिक संस्था अस्तित्वात आहेत ; नाही असे नाही ! परंतु त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर बंदी आणावी ! नाहीतर आम्ही करत असलेल्या मुद्द्यावर लक्ष घालून प्रश्न सोडवावा ! कारण भारताची राज्यघटना प्रत्येक सजीवाच्या जगण्याच्या हक्कांचे संरक्षण करणारी आहे . काही सामाजिक संस्था अस्तित्वातच यासाठी आल्या आहेत कि देशी आणि विदेशी निधी बेईमानी करून हडप करता यावा यासाठीच ! याचा अर्थ ज्या संस्था प्रामाणिकपने संबंधित प्रश्न सोडण्यासाठी काम करत आहेत त्या संस्थांवर घाला का म्हणून ? 
मला खुपदा या प्रकारच्या प्रश्नाची विचारणा होते कि तुम्ही राजकारणावर कशाला बोलता किंवा लिहिता ? तेव्हा मी त्यांना सांगतो कि मला सामाजिक भूमिका आहे म्हणजेच राजकीय भूमिका आहे ! समाजकारण आणि राजकारण ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत ! ' राजकारण ' म्हणजे आपले हितसंबंध बरया वाईट हेतूने वापरणे होय ! त्याचबरोबर हे ' वापरणे ' म्हणजे त्या संबंधासाठी योगदान देणेसुद्धा आहे ! राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टींना भिन्न ठरवून कुठलीच भूमिका न घेणारे कित्येक समाजसेवक आहेत . त्यांना असे वाटत असावे कि आपण भले आणि आपले काम भले ! कित्ती दिव्य काम करत आहोत आपण वगैरे . परंतु सदासर्वकाळ आणि त्याच क्षमतेने फक्त आपणच ' हा ' प्रश्न सोडवू शकतो असे समजने चुकीचे आहे . समाजकार्य व्यापक प्रमाणात सफल व्हावे यासाठी सरकारकडेसुद्धा यासाठीच्या भूमिकेचा आग्रह आपण धरला पाहिजे . हे कार्य समांतर व्हायला हवे . सरकारने भूमिका घ्यावी यासाठी पाठपुरावा आणि त्याचवेळेला शक्य असल्यास पर्याय देणे . सरकारच्या हस्तक्षेपाने खुपश्या सेवा व्यापक होऊ शकतात . परंतु सरकारशिवाय काही अडते असे मुळीच नाही ; उलट हे काम सरकारशिवायही जोमाने आणि अधिक सर्जनशील होते ! परंतु नंतर आपल्याला कुनि असे म्हणायला नको कि , आपण हे कार्य व्यापक करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत वगैरे किंवा आपली खाज आहे किंवा हे काम चारीटेबल आहे वगैरे ! ' सरकार मदत कधीच करू शकणार नाही त्यामुळे आपण कशाला या फंदात पडूया ' असे म्हणणे योग्य होणार नाही . मी शासकीय कर्मचार्यांशी सेवेबद्दलचा आग्रह आणि त्याच वेळी पर्याय देण्याचा जास्तीच जास्त प्रयत्न करतो . 
हो ! मला राजकीय भूमिका आहे . या भूमिकेतूनच माझ्या जीवप्रेरणेचे समृद्धीकरण चालू आहे !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा